मुंबई ते गोवा हे अंतर 589 किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात. तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त 6 तासात शक्य होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी (Mumbai to Ratnagiri) प्रवास फक्त साडे 3 तासात पूर्ण होणार आहे.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणवासियांसाठी खूशखबर आहे. मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत रोरो सेवा चालवण्याची परवानगी राज्य सरकारला मिळाली आहे. मत्स्य आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लगेचच ही सुविधा सुरू करता येत नाही. मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत रोरो सेवा सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे अवघ्या साडे तीन तासांत मुंबईहून तळकोकणात जाता येणार आहे. तसंच दक्षिण आशियातील ही सर्वाधिक वेगवान बोट असणार असल्याचं त्यांनी सांगितले. 620 प्रवासी आणि 60 वाहने वाहून नेण्याची क्षमतेचे हे जहाज असेल.
गणेशोत्सवात भाविकांना मुंबई ते कोकण असा प्रवास अतिजलद, केवळ सहा तासांत करता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली होती. मुंबई विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो रो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी दोन – तीन दिवस आधी सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला. त्यानुसार विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव येथे रो रो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रो-रो जेट्टीत रूपांतर करण्याचे काम मागील काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करत 21 ऑस्टपासून रो-रो सेवेची साधणी सुरू करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. रो-रोच्या दृष्टीने इतर पायाभूत सुविधाही साकारण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असून, रो-रो सेवा अद्यापही सुरू झालेली नाही ऑगस्टपर्यंत पूर्ण करत 21 ऑस्टपासून रो-रो सेवेची चाचणी सुरू करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. रो-रोच्या दृष्टीने इतर पायाभूत सुविधाही साकारण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असून, रो-रो सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. आता ही रो रो सेवा कधी सुरु होणार याचा खुलासा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
