हातकणंगले तालुक्यातील आरोग्य सेवा विस्कळीत

हातकणंगले, (Hatkanangle) तालुक्यातील कंत्राटी कामगारांना नियमित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपामुळे हातकणंगले तालुक्यात १२४ कर्मचारी संपावर गेले आहेत त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

हातकणंगले तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र १० असून उपकेंद्रे ४६ आहेत तर आरोग्य पथके २ आहेत तसेच आयुर्वेदिक दवाखाना एक आहे यामधील ६३ कर्मचारी संपावर गेले आहेत तसेच इचलकरंजी शहरामध्ये प्राथमिक 
 आरोग्य केंद्र सहा असून यामधील ६१ कर्मचारी देखील संपावर गेल्याने तालुक्यातील जवळपास १२४ कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे तालुक्याची आरोग्य सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे.
४ मार्च २०२४ रोजी निघालेल्या आदेशानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी बिनशर्त सेवेत समावेश करण्याचा आदेश दिला होता मात्र या आदेशाची आजतागायत अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक कर्मचारी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहिले आहेत या प्रमुख मागणी साठी २५ ऑगस्ट २०२५ पासून पुकारलेल्या संपामुळे तालुक्यातील आरोग्यसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे..

 तालुक्यातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या
आरोग्य सेविका १९, स्टाफ नर्स ३० तालुका लेखापाल १, कार्यक्रम सहाय्यक १, समुदाय आरोग्य अधिकारी, एस. टी. एस ३, एस.टी.एल.एस २, लॅब टेक्निशियन ३, टी. बी. एच. व्ही ३, याचबरोबर इचलकरंजी नागरी विभागातील ६ आरोग्य केंद्रामधील एकूण ६१ कर्मचारी संपावर आहेत.