डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि मेंदूला कार्यक्षमतेने काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्वचेसाठीही डार्क चॉकलेट फायदेशीर ठरते कारण त्यातील घटक त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. मात्र, ते मर्यादित प्रमाणातच खावे हे महत्त्वाचे आहे

हृदयासाठी चांगले: डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉईड्स रक्ताभिसरण सुधारतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

मेंदू तल्लख ठेवते: यामधील नैसर्गिक घटक स्मरणशक्ती सुधारतात आणि लक्ष केंद्रीत करण्यात मदत करतात. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते – योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.

मूड सुधारते: डार्क चॉकलेटमधील थिओब्रोमिन आणि सेरोटोनिन मूड बूस्टर म्हणून काम करतात, ज्यामुळे तणाव कमी होतो.

वजन कमी करण्यात मदत: थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने भूक कमी लागते आणि अति खाण्याची सवय टाळता येते.

त्वचेसाठी फायदेशीर: सूर्यकिरणांपासून त्वचा वाचवते आणि आतून पोषण देते.

हाडांसाठी उपयुक्त: यामध्ये मॅग्नेशियम व इतर मिनरल्स असतात जे हाडांना मजबूत ठेवतात.