‘या’ वाहनांना आता अटल सेतू. समृद्धीसह मुंबई पुणे महामार्गावर टोलमाफी

काही दिवसांपूर्वी अटल सेतू महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अटल सेतूप्रमाणेच आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळं इलेक्ट्रिक कार चालकांना मोठा फायदा मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळं पुणे, पिंपरी-चिंचवड या परिसरातील नागरिकांना जास्त फायदा होणार आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केले आहे. त्यामुळं ई-वाहनांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

या वाहनांना टोलमाफी
इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील, इलेक्ट्रिक बसेस, राज्य परिवहन उपक्रम (STU) तसंच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3,M6) प्रकारातील वाहनांना टोल माफी आहे. ही सूट 22 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू महामार्ग या मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ई-वाहन वापरामुळं इंधन खर्च वाचणार असून यामुळं प्रदूषणदेखील होणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं ई-वाहनांना मोठा फायदा होणार आहे.