तुम्हालाही होतोय पित्ताचा त्रास? खास रामबाण उपाय

मित्रांनो अलीकडच्या या धावपळीच्या युगामध्ये अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. अनेक वेगवेगळे रोग हे डोके वर काढताना आपणाला दिसत आहेत. अनेक वेगवेगळ्या आजारांचा आपणाला सामना हा करावाच लागतो. त्यापैकी काही जणांना पित्ताचा त्रास खूपच असतो. आपण जे काही खातो ते खाल्लेले अन्न पचविण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो. जेव्हा ते नियंत्रणामध्ये असते, तेव्हा पचनशक्ती उत्तम असते.

परंतु जेव्हा ह्याचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ह्याच पित्ताचा त्रास होऊ लागतो, पचनशक्ती कमी होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आमाशयामध्ये तसेच पडून राहते. आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आम्लपित्त म्हणून करण्यात आला आहे.

वाढलेल्या पित्ताची लक्षणे

मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात आणि मग सुरु होतो पित्त कमी करण्याच्या गोळ्या घेणे, त्याने तात्पुरता त्रास कमीही होतो, पण ह्या पित्तशामक गोळ्यांचाही शरीरावर दुष्परिणाम होत असतो.म्हणून पित्त कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.

पित्त वाढण्याची कारणे

भूक लागल्यावरही न खाणे, कमी किंवा अति मात्रे मध्ये खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे, रात्री जागरण करणे, भूक मारण्यासाठी किंवा झोप घालवण्यासाठी चहा, कॉफी अतिप्रमाणात घेणे, दारू, सिगारेट, तंबाखू सारखे व्यसन करणे, महत्वाचे म्हणजे सध्या “हाय प्रोटीन डायट”च्या नावाखाली जो रोज मांसाहार किंवा कडधान्य खाल्ले जातात. त्यामुळेही पित्ताचा त्रास वाढतो. घाईघाईने जेवण संपविणे, जेवण म्हणुन नुसतेच कच्चे सॅलड खाणे खासकरून रात्री कच्चे सॅलड खाणे, चिडचिड राग संताप करत जेवण करणे, अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीनुसार कारणे वेगवेगळी असू शकतात.

पित्तावर उपाय

ह्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे दर ४ तासांनी खाणे, भूक लागेल तेव्हा नक्की खावे उपाशी राहू नये, प्रमाणात खाणे, आहारामध्ये तुपाचा वापर वाढवणे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच खडीसाखर किंवा केळ खाल्ल्याने पित्तही कमी होते.

काय टाळावे

कच्च्या भाज्या किंवा सॅलड, तीळ, जवस, कारळ यांसारख्या बिया, ड्राय फ्रुटस, काजू बदाम शेंगदाणे यासारखे नटस, कडधान्य (रोज नको), पालेभाज्या, लसूण, शिळे अन्न, पॅकेट्स मधील अन्नपदार्थ, खारट पदार्थ जसे चिप्स, चीज इत्यादी. वारंवार चहा कॉफीचे अतिसेवन, मांसाहार, तळलेले पदार्थ,जागरण, जेवणानंतर लगेच झोपणे, उपाशी राहणे तसेच अतिप्रमाणात खाणे, अवेळी खाणे, रात्री ९ नंतर खाणे, दारू सिगारेट तंबाखू सारखे व्यसन, वेदनाशामक गोळ्या, दही, आंबवून केलेले पदार्थ.

पित्तावरील रामबाण उपाय पंचामृत

दुध, दही, तूप, मध, साखर किंवा केळ ह्यापासून बनविलेले पंचामृत वाढलेले पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. महिनाभर रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास 15 दिवस ते 3 आठवड्यांमध्ये पित्त कमी झालेले आढळून येईल .पंचामृत सकाळी, दुपारी खा, पण उपाशीपोटी खाल्ल्याने चांगला परिणाम दिसून येतो.

पंचामृत प्रमाण – दही २ भाग आणि बाकी सर्व जिन्नस १-१ भाग

तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली तर तुम्हाला देखील पित्ताचा त्रास अजिबात जाणवणार नाही.