भारत 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा आयसीसी विमेन्स वनडे वर्ल्ड कप 2025 चं यजमानपद भूषवणार आहे. 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना रंगणार आहे. त्याआधी होणाऱ्या ओपनिंग सेरेमनीत सुप्रसिद्ध गायिका श्रेय्या घोषाल आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
या स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. सर्वात खास बाब म्हणजे एका सामन्याचं तिकीट फक्त १०० रुपयांत उपलब्ध आहे. म्हणजेच एका कॉफीपेक्षा स्वस्तात वर्ल्ड कपचा थरार थेट स्टेडियममध्ये अनुभवता येणार आहे.
तिकीट बुकिंग कसं कराल ?
अधिकृत संकेतस्थळावर लॉग-इन करून “बुक माय शो” लिंकवर पोहोचता येईल.
तिथे तुम्हाला सर्व पाच स्टेडियमची यादी दिसेल.
ज्या ठिकाणी सामना पाहायचा आहे, ते निवडा आणि “बुक नाऊ” वर क्लिक करा.
ऑनलाईन पेमेंट करून तिकीट लगेच मिळेल.
4 ते 8 सप्टेंबर या कालावधीत गूगल पे युजर्ससाठी प्री-सेल विंडो आहे.
9 सप्टेंबरपासून सर्वांसाठी सार्वजनिक विक्री सुरू होईल.
सामन्यांचे स्थळ काय आहेत?
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
एसीए स्टेडियम, गुवाहाटी
एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
होल्कर स्टेडियम, इंदूर
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आठ संघ यावेळी खेळणार आहेत. राउंड-रॉबिन फेरीत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एकदा भिडणार असून 28 सामने खेळवले जातील. टॉप4 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
