भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची वर्णी ?

देशाच्या राजकीय पटलावर सध्या अनेक हालचाली सुरू असून, या हालचाली आहेत उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार निवडून देण्यासाठीच्या. 9 सप्टेंबर 2025रोजी उपराष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीनं कंबर कसली आहे.

इथं निवडणुकीच्या धर्तीवर एनडीएच्या खासदारांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलेलं असतानाच इंडिया आघाडीच्या खासदारांकडून सोमवार (8 सप्टेंबर 2025) रोजी मॉक पोलद्वारे सराव घेतला जाणार आहे. त्यामुळं आता उपराष्ट्रपतीपदी कोण विराजमान होणार याचकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठीच्या दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान पक्षाचा इतिहास, पक्षासह देशाचा विकास आणि खासदारांची कार्यक्षमता वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. या अतीव महत्त्वाच्या निवडणुकीपूर्वी खासदारांना योग्य दिशा आणि मतप्रक्रियेसाठीचं प्रशिक्षण देणं हा यामागचा मुख्य हेतू होता. , हा होता.

उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत. तर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. या पदासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होत असून लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील अर्थात राधाकृष्णन हे तामिळनाडूचे, तर रेड्डी हे मुळचे तेलंगणाचे आहेत. त्यामुळं दक्षिण भारताच्या दृष्टीनंही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून घेण्यात आलेल्या प्रशिक्षणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे सर्वांत मागच्या रांगेत बसल्याचं पाहायला मिळालं. गोरखपूरचे खासदार रवि किशन यांनी या क्षणाचं छायाचित्र शेअर करत इथं प्रत्येकजण कार्यकर्ता आहे आणि ही भाजपची ताकद आहे, असं कॅप्शन लिहिलं.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना मतदान करण्याचा अधिका आहे. राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदान करता येणार आहे. या 17 व्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एकूण 788 सदस्य असून, यात राज्यसभेचे 233 सदस्य निवडून आलेले आहेत, तर पाच जागा अद्यापही रिक्त आहेत. याशिवाय राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित आणि लोकसभेच्या 543 सदस्यांचाही यात समावेश आहे.