चहा पिण्याची योग्य वेळ कोणती ?

चहा हा बहुतांश लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. सकाळी डोळे उघडताच, कामाच्या वेळी ताजेतवाने होण्यासाठी किंवा संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी आपण चहा पितो. मात्र, चहा पिण्याची योग्य वेळ जाणून घेतली तर त्याचे आरोग्यदायी फायदे अधिक मिळू शकतात. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. त्यामुळे आम्लपित्त वाढू शकते आणि पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो. सकाळी हलक्या नाश्त्यानंतर एक कप चहा घेणे योग्य मानले जाते. यामुळे शरीराला ताजेतवानेपणा मिळतो आणि अन्न पचनास मदत होते. जेवल्यानंतर ताबडतोब चहा पिल्यास लोह शोषण कमी होते. त्यामुळे जेवल्यानंतर किमान १ ते १.५ तासांनीच चहा घ्यावा. रात्री झोपायच्या आधी चहा पिल्यास त्यातील कॅफीनमुळे झोप नीट येत नाही. त्यामुळे झोपण्याच्या ३-४ तास आधी चहा घेणे थांबवावे. दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी थकवा जाणवला की चहा घेणे उत्तम. यावेळी घेतलेला चहा उर्जा वाढवतो.