सांगली शहरातील कुपवाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनय संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.साक्षी रवींद्र जाधव (राहणार मिरज) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत साक्षी कुपवाड हद्दीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली.
साक्षीने आपली स्कूलबॅग शाळेच्या बसमध्ये ठेवली. त्याच वेळी तिचे पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली.दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे ४० ते ४५ फूटाच्या अंतरावरून तिने उडी मारली.
या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.