आशिया कप स्पर्धेतील 6 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. रविवार 14 सप्टेंबर रोजी भारत- पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार असून यात भारताची प्लेईंग 11 कशी असणार याविषयी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकतता आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. तेव्हा सिलेक्टर्स हे या महत्वाच्या सामन्यासाठी कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये निवडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
14 सप्टेंबर रोजी होणारा सामान हा भारत – पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे भारताने 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध सामना खेळला यात त्यांनी 9 विकेटने विजय मिळवला. तर पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी विजय मिळवला. भारत पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये असून सध्या त्या दोघांचेही एक – एक पॉईंट्स झाले आहेत. आता जो संघ रविवारचा सामना जिंकेल त्यांचे सुपर 4 मध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढतील.
भारत आणि पाकिस्तान संघ आशिया कपच्या टी 20 स्पर्धेत आतापर्यंत 19 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 10 सामने भारताने तर 7 सामने पाकिस्तानने जिंकले. तर 2 सामने हे पावसामुळे रद्द झाले. रविवारी होणारा सामना हा दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत अनेक चर्चा आहेत. खासकरून अर्शदीप सिंहला संघात घेण्यावरून. यूएई विरुद्ध पहिल्या सामन्यात शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सुद्धा ते ओपनिंग करताना दिसतील. मिडिल ऑर्डरची जबाबदारी सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यावर असेल. ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या,अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे खेळताना दिसतील. संजू सॅमसन विकेटकिपर आणि फिनिशर म्हणून भूमिका निभावताना दिसतील. गोलंदाजी विभागात, जसप्रीत बुमराह, पंड्या, दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे भारतीय आक्रमणाला बळकटी देतील.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
