सोलापुरातील कांदा अडत व्यापाऱ्याची साडे चार कोटी रुपयांची फसवणूक

सोलापुरातील कांदा अडत व्यापाऱ्याची तब्बल साडे चार कोटी रुपयांची (trader) फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केरळमधील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा खरेदी करुन साडे चार कोटी रुपये अदा न केल्यानं केरळमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन असे केरळ येथील रहिवासी असलेल्या आरोपीचे नाव आहे.

ल भारत ओनियन या दुकानातून कांदा खरेदी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत (trader) नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन या दोघा भावांडानी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भारत ओनियन या दुकानातून कांदा खरेदी केला होता. या दोघांनी आतापर्यंत चार कोटी 55 लाख 95 हजार रुपये 71 रुपयांचा कांदा खरेदी केला आहे. अद्याप या दोघांनी कांद्याचे पैसे अदा केले नाहीत. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भारत ऑनियनचे मालक साजिद अजमेरी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात दिली फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. 

विश्वास संपादन करुन फसवणूक

साजिद अजमेरी यांचे भारत ओनियन नावाने सोलापूर मार्केट यार्डात कांद्याचा आडत व्यवसाय आहे. केरळातील नजीब हमजा अंचलन आणि फतेह हमजा अंचलन यांनी साजिद अजमेरी यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कांदा घेतला. सुरुवातीला घेतलेल्या कांद्याची रक्कम आरोपींनी वेळोवेळी दिली होती. यानंतर साजिद अजमेरी यांनी विश्वासाने केरळातील या दोघा व्यापाऱ्यांना 23 नोव्हेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान 4 कोटी 55 लाख 95 हजारांचा कांदा विक्री केला होता. या विश्वासाचा फायदा घेत केरळातील व्यापाऱ्यांनी सोलापुरातील कांदा व्यापाऱ्याची जबर फसवणूक केली आहे. कोट्यावधी रुपयांची रक्कमेची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर 25 ऑगस्ट 2023 रोजी सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. 

सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी उलाढाल

सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि रब्बीतील कांदा या हंगामात मार्केटमध्ये येतो. याच दरम्यान कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही कांद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे सोलापूरचे कांदा मार्केट या कालावधीत चांगलेच चर्चेत येते. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या राज्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र सोलापूर बाजार समितीतील कांद्याची आवक वाढत आहे.