सांगोला तालुक्यातील ९० जनावरांना ‘लम्पी (Lumpy) या रोगाची लागण झाली आहे. याबाबत पशु विभाग खडबडून जागा झाला असून , जनावरांना लसीकरण करण्याची मोहीम तातडीने हाती घेतली आहे. लम्पि हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी आजअखेर ७० हजार जनावरांना लस टोचणी केली असून, उर्वरित जनावरांना लसीकरण करण्यासाठी ४० हजार डोस मागवण्यात आल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. असलम सय्यद यांनी दिली आहे.
सांगोला तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक कुटुंबांनी पशुपालन उद्योग सुरु केला आहे. जनावरांच्या दूध उत्पादनातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु आहे. परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून जनावरांना ‘लम्पी (Lumpy) या रोज प्रादुर्भावामुळे पशुपालक मोठ्या संकटात सापडला आहे. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू होतो, तर यातून आर्थिक नुकसानीलाही पशु विभाग वेळोवेळी लसीकरब मोहीम राबवून जनावरांचा मृत्यू होणार नाही, याबाबत प्रयत्नशील असते.
पशु जनगणनेनुसार सांगोला तालुक्यात एकूण ७ लाख ४७ हजार जनावरांची संख्या आहे. दरम्यान , या जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम यापूर्वीच राबविण्यात आली आहे. तत्पूर्वी सध्या ‘लम्पी या आजाराने डोके वर काढले आहे. जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदरची बाबहि पशुपालक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबतीत पशुवैद्यकीय झाडून कमल लागला आहे. तातडीने लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पशु विभागाच्या आदेशानुसार गावस्तरावर जनावरांच्या आजाराबाबत पडताळणी केली जात आहे. तर गावागावांत ‘लम्पी या आजारावर लसीकरण राबविण्यात येत आहे.
