महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे क्रूज टर्मिनल ; एकाचवेळी 5 मोठी जहाजे उभी राहतील

महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे क्रूज टर्मिनल उभारण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील इंदिरा डॉक येथे मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल बांधण्यात आले आहे. येथे प्रवाशांना जागतिक दर्जाची जलवाहतूक सुविधा मिळणार आहे. या क्रूज टर्मिनलवर एकाचवेळी 5 मोठी जहाजे उभी राहतील. येथे 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. 10 लाख प्रवासी क्षमता आहे.

एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलच्या पहिले दोन मजले 207,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथून या टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेल्या पद्धतीने डिझाइन केले आहे.

या क्रूज टर्मिनलवर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात. याची लांबी 11 मीटर आणि लांबी 300 मीटर पर्यंत आहे. पार्किंगमध्ये एकाच वेळी 300 हून अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात. एमआयसीटी प्रकल्पात एकूण 556 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एमआयसीटीची रचना लहरी छताने करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम 2018 मध्ये सुरू झाले. ते अंदाजे 4.15 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या टर्मिनलमध्ये 22 लिफ्ट, 10 एस्केलेटर आहेत. विशेष म्हणजे हे टर्मिनल एका वेळी 2 मोठ्या क्रूझ जहाजांना सहजपणे हाताळू शकते. या क्रूज टर्मिनलचे डिजाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याचे प्रवेशद्वार मुंबईच्या वारशापासून प्रेरणा घेत असल्याचे दिसून येते. याच्या छताचा आकार या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहे. येथे प्रवाशांसाठी खास आसन व्यवस्था तसेच सेल्फी पॉइंट्स असणार आहे.