TATA IPO: तारीख नोट करा Share Market मध्ये मोठा टर्निंग पॉइंट…

टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी आयपीओ बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. टाटा कॅपिटलचा IPO पुढील महिन्यात दिवाळीआधी बाजारात धडक देणार असून हा वर्षातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. या IPO मध्ये कंपनी नवीन शेअर्स जारी करेल तसेच, विद्यमान शेअरधारक देखील त्यांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्याभराच्या तेजीनंतर देशांतर्गत मार्केटमध्ये चालू आठवड्यात खळबळ उडाली असून सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे पण, बाजारात लवकरच मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. सणासुदीच्या काळात टाटा समूह नवीन प्लेअर बाजारात उतरवणार आहे.

दिवाळीच्या आधी शेअर बाजारात टाटा करणार धमाका
तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा टाटा ग्रुपचा आयपीओ बाजाराच्या दारावर ठकठक करत आहे. टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी आयपीओ बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत असून टाटा कॅपिटलचा IPO पुढील महिन्यात दिवाळीआधी धमाकेदार एन्ट्री घेऊ शकतो. हा वर्षातील सर्वात मोठा आयपीओ असणार असून कंपनी नवीन शेअर्स जारी करेल, तर विद्यमान शेअरधारक देखील त्यांचे शेअर्स विकतील.

टाटा कॅपिटलच्या IPO चा मुहूर्त ठरला!
टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबर रोजी सेबी आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे. अशाप्रकारे, कंपनीने मेगा आयपीओच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. RBI नियमांनुसार टाटा कॅपिटलसारख्या मोठ्या नॉन-बँकिंग वित्तीय, NBFC, कंपनीला 30 सप्टेंबरपर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध करणे आवश्यक होते. पण, कंपनीने ही अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी आरबीआयकडे आणखी काही वेळ मागितला असून नियोजित प्रमाणे आयपीओ प्रथम 3 ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी उघडेल.

टाटा कॅपिटल IPO ची माहिती
एक्सचेंजने जारी केलेल्या माहितीनुसार, प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्यासह या IPO मध्ये 210,000,000 शेअर्सचा नवीन इश्यू आणि 265,824,280 इक्विटी शेअर्स OFS असतील. कंपनीचा IPO सोमवार 6 ऑक्टोबर रोजी उघडेल आणि बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी बंद होईल. बाजारातील गुंतवणूकदारांच्या आधी हा आयपीओ 3 ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल, महत्त्वाचे म्हणजे, हा आयपीओ टाटा समूहाचा सर्वात मोठा इश्यू असणार आहे. या आयपीओचा एकूण आकार सुमारे 17,200 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे आणि हा या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ असेल.