शेअर बाजाराने घेतला युटर्न, गुंतवणूकदारांना बसला शॉक; 16 लाख कोटी पाण्यात, IT भुईसपाट

या आठवड्यात अमेरिकेच्या दोन निर्णयांमुळे भारतीय शेअर बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी50 निर्देशांक 24,650 च्या पातळीच्या खाली आला असून शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटचं दिवशी झालेली पडझड ही बाजारातील घसरणीचा सलग सहावा दिवस ठरला.

शेअर बाजारातील घसरण आज सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिली आणि शुक्रवारी भारतीय शेअर बाजारासाठी चालू आठवडा काही खास ठरला नाही. देशांतर्गत मार्केटमध्ये सलग सहाव्या दिवशी पडझड झाली पण, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, बाजारात विक्रीचा जोर वाढला. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात निफ्टी50 निर्देशांक 24,650 च्या खाली आला असून संपूर्ण आठवडा बाजारासाठी तोट्याचा आठवडा होता, प्रत्येक सत्रात प्रमुख निर्देशांक त्यांच्या मागील पातळीपेक्षा खाली बंद झाले.

देशांतर्गत बाजाराला लागली घसरणीची भुरळ
बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल एका आठवड्यात अंदाजे 16 लाख कोटींनी घसरले तर, या घसरणीचे मुख्य कारण पुन्हा एकदा परदेशातून आले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला देश आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसमोर दोन मोठ्या घडामोडी होत्या. पहिली, GST दर कपात आणि दुसरी, ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा शुल्कात वाढ केली. मात्र गुंतवणूकदारांची भावना नकारात्मक गोष्टीकडे झुकली, ज्यामुळे बाजाराला घसरणीची भुरळ पडली. सततच्या घसरणीमुळे शुक्रवारीच्या एक्सपायरीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात येतील अशी आशा होती पण त्याआधीच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आणखी एक बॉम्ब टाकला आणि औषध आयातीवर 100% कर लादला.