हातकणंगले शहरातील रस्ते हे ठीकठिकाणी उखडलेले आहेत. तसेच अनेक मोठमोठे खड्डे देखील या रस्त्यावरती पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. कारण या लहान मोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तसेच स्टेशन रोडकडे जाणारा रस्ता हा खूपच खराब असल्याने नागरिकांना येजा करण्यामध्ये खूपच अडचण निर्माण होत आहे. तसेच नगरपंचायतीकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे हा देखील खूपच खराब झालेला आहे.
रेल्वे ब्रिज खाली देखील खूपच मोठी खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी देखील निर्माण होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने याकडे पुरेपूर लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.