कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन गट्टी जमली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले आहे. पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीची सध्या राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली. कालच हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. तर कोल्हापूरच्या राजकारणातील नवे ‘जय-विरु’ असेही या जोडगोळीला उल्लेखलं जात आहे.
Related Posts
ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैपासून…
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.येत्या…
काँग्रेसचे निष्ठावंत, करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचे…
पुणे कोल्हापूर प्रवाशांची संख्या लक्षात घेता, बसफेऱ्या वाढवल्यापुणे कोल्हापूर
कोल्हापूरहून पुण्याकडे आणि पुण्यावरून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं मोठा निर्णय…