आयपीएल 2025 मध्ये असे काही घडणार आहे जे या स्पर्धेच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली. पण RCB टीम विकली जाणार आहे. डियाजियोची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) त्यांचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विकण्याची तयारी करत आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 177530000000 रुपयांना RBC टीम खरेदी करणार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला हे या संघाला खरेदी करण्यासाठी आघाडीवर आहेत. पूनावाला हे पुण्यातील सरव्ता श्रीमंत व्यक्ती आहेत. यूएसएलला या फ्रँचायझीसाठी 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 17,762 कोटी रुपयांचे मूल्यांकन हवे आहे. यामुळे आरसीबी जगातील सर्वात महागडी टीम ठरणार आहे. आरसीबी हा डिएगोसाठी “नॉन-कोअर” व्यवसाय आहे, म्हणून ते ते विकू इच्छितात. या करारासाठी जागतिक गुंतवणूक बँक सिटीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा विजय आणि बेंगळुरूमधील दुःखद घटनेनंतर संघाच्या विक्रीच्या अफवा तीव्र झाल्या.
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ही एक मोठी कंपनी आहे. ही लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रिटीश बहुराष्ट्रीय मद्य कंपनी डायजिओची उपकंपनी आहे. USL त्यांचा आयपीएल संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विकू इच्छित आहे. इतक्या मोठ्या किंमतीमुळे RCB जगातील सर्वात मौल्यवान क्रीडा संघटनांपैकी एक होईल. विक्री प्रक्रिया हाताळण्यासाठी जागतिक गुंतवणूक बँक सिटीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सिटी हा करार पूर्ण करण्यास मदत करेल.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला हे या करारासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. डिएगो गेल्या काही काळापासून आरसीबीच्या विक्रीवर लक्ष ठेवून होते. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान संघाच्या विक्रीच्या अफवा वाढल्या. बेंगळुरूमध्ये उत्सवादरम्यान एक दुःखद चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून RCB टीम चर्चेत आहे. अदार पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीने कोविड-19 साथीच्या काळात कोविशिल्ड लस विकसित केली.
