लोकसभा लढवण्याची हसन मुश्रीफ यांचीही आहे इच्छा

महायुतीतील तिनही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून जर माझ्या पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवेन, अशी इच्छा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना मुश्रीफ यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

सध्या कोल्हापूर लोकसभेचे खासदार शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत.दरम्यान, काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्शवभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती ही निवडणूक एकत्र लढणार आहे. यासाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जागांचे समसमान वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.तर दुसरीकडे, मावळ लोकसबेवरुन महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारेणे यांना अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विरोध सुरू केला आहे. त्यांनी आधी नऊ वर्षात काय कामे केली हे समोर ठेवावे आणि नंतर निवडणुकीला सामोरे जावावे, असं आ्व्हान सुनील शेळके यांनी दिले आहे.

त्यामुळे आता या जागेवरुन महायुतीत अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच आता कोल्हापूरच्या जागेवर हसन मुश्रीफ इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत, यामुळे आता महायुतीत जागावाटपावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.