प्राजक्ता राहुल पाटील (वय २४) या विवाहितेला तिच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहुल सिदराम पाटील (रा. म्हाकवे, ता. कागल) व त्याच्या घरचे पत्नी प्राजक्ता हिला काही महिन्यांपासून तू लग्नामध्ये चांगला मानपान केला नाहीस, माहेरून काहीच घेऊन आली नाहीस, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करत होते.
२० ऑक्टोबर रोजी राहुल याने हातात तलवार घेऊन तिच्या माहेरी म्हाळुंगे (ता. करवीर) येथे दारात येऊन तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्राजक्ता हिने इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. याबाबत राहुल व त्याच्या घरच्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.