मोड आलेले मूग म्हणजे नैसर्गिक पोषण आहे. याचे अनेक फायदे जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्या शरीरात व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनची कमी असल्यामुळे तुम्ही मोड आलेले मूग खाऊ शकता. यामध्ये असेलेले व्हिटॅमिन A, B, C, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम यासारखे अनेक घटक असतात. मोड आलेल्या मूगांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत करू शकतं.जर तुम्ही मोड आलेले मूग खाल्ले तर हे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. तसेच यात असलेले एंझायम्स तुमचं पचन सुधारण्यास आणि रक्तभिसरण चांगलं ठेवण्यास मदत करतं. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि मुरूम असतील तर हे मोड आलेले मूग खाऊ शकता. यात असलेले सर्व व्हिटॅमिन्स तुमच्या केसांसाठी लागणारे भरपूर प्रमणात आढळतात. यामुळे केसगळतीपासून आणि त्वचेला पोषण मिळतं. हे मोड आलेले मूग तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर यांसारख्या भाज्या आणि लिंबाचा रस घालून कच्चे किंवा वाफवून सॅलडसारखखं खाऊ शकता.
मोड आलेल्या मुगाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
