इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुन्हा होणार आहे. चार दिवसापूर्वी प्रभाग आरक्षण सोडत झाली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अचानक ओबीसी सर्वसाधारण; ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची सोडत नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत, त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत ओबीसी व सर्वसाधारण महिला जागांसाठी प्रक्रिया : नवी सोडत १७ नोव्हेंबरला
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक घोरपडे नाट्यगृहात नवी आरक्षण सोडत पार पडणार आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही पुन्हा तापणार आहे.
इचलकरंजी महापालिक 1 निवडणुकीसाठी १६ प्रभागांतून चार सदस्यीय प्रणालीद्वारे ६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नुकतीच ११ नोव्हेंबर रोजी घोषित झालेल्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार तयारीला लागले असतानाच आयोगाने शुक्रवारी नव्याने आदेश काढल्याने राजकीय गणिते बदलणार आहेत.
नव्याने काढण्यात येणाऱ्या सोडतीत एससी, एसटी आणि मागास प्रवर्गाच्या आरक्षित जागांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व महिला आणि सर्वसाधारण महिला या दोन प्रवर्गांसाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. अनेक प्रभागांतील आरक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
नव्या आदेशाप्रमाणे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पुन्हा सोडत होणार आहे. त्यानंतर आरक्षणाची प्रारुप प्रसिध्दी १९ नोव्हेंबर रोजी आणि आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी २५ नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे. नवीन सोडतीनंतर प्रभागांतील समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे.
