भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठ यश मिळवलं आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बीटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं.
इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.आदित्य एल-1ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये जो लॅग्रेज (L1) पॉइंट आहे, त्या हॅलो कक्षेत स्थापन करण्यात आलं. लॅग्रेज (L1) पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होतं. L1 पॉइंटवरुन सूर्यावर सतत नजर ठेवली जाईल.
या यानामुळे सूर्याजवळ घडणाऱ्या घडामोडी आणि अवकाश हवामानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येईल.स्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 च यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेलं. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देणं हाच ‘आदित्य एल1’ मिशनचा उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.
