आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. या लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. फ्रेंचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. खरं तर काही महागडे खेळाडू रिलीज करून त्यांना पुन्हा कमी भावात घेण्याची रणनीतीही असू शकते. आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, डेविड मिलर, रवि बिश्नोई, महीश तीक्षणा आणि वानिंदु हसरंगा या सारख्या दिग्गज खेळाडूंना रिलीज केल्याने मिनी लिलावात रस्सीखेच पाहायला मिळेल. मिनी लिलावात कोणता खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जाईल याबाबतही उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात प्रत्येक संघाला लिवात काय हवं आणि त्यांची रणनिती काय असू शकते? …
कोलकाता नाइट रायडर्स : केकेआर फ्रेंचायझीच्या पर्समध्ये मिनी लिलावापूर्वी 64.3 कोटी रुपये आहेत. त्यामुळे मोठी रक्कम पर्समध्ये आहे. सध्या 12 खेळाडू संघात आहे. तर एकूण 13 स्लॉट रिकामी असून त्यात 6 विदेशी खेळाडूंसाठी आहेत. केकेआरने आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, क्विंटन डिकॉक आणि गुरबाज यांना रिलीज केलं आहे. त्यामुळे हे स्लॉट भरणं गरजेचं आहे. केकेआरला विकेटकीपर, ओपनर बॅटर आणि एक अनुभवी अष्टपैलू खेळाडूची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे केकेआर मॅकगर्क, डुप्लेसिस, रचिन रवींद्र, कॉनवे आणि मिलनसाठी मोठी बोली लावू शकते.
कोलकाता नाइट रायडर्सने रिटेन केलेले खेळाडू: वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रोवमन पावेल, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक
चेन्नई सुपर किंग्स : चेन्नई सुप किंग्सने एकूण 43.4 कोटी रुपये आहेत. सध्या संघात ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलेल्या संजू सॅमसनसह 18 खेळाडू आहे. त्यामुळे 9 खेळाडूंची जागा शिल्लक आहे. त्यात 4 जागा या विदेशी खेळाडूंच्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू सॅम करनला सोडल्याने संघाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे संघाला एका टॉप क्लास अष्टपैलू विदेशी खेळाडूची गरज आहे. मथीशा पथिरानाला रिलीज केल्याने एका सीम गोलंदाजीचा बॅकअप हवा आहे. त्यामुळे या दोन जागा भरून काढण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स या लिलावात मोठी बोली लावू शकते. आता कोणत्या खेळाडूसाठी बोली लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
चेन्नई सुपर किंग्सचे रिटेन केलेले खेळाडू : एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओवर्टन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल. (संजू सॅमसन (ट्रे़ड))
दिल्ली कॅपिटल्स : दिल्लीला पहिल्या जेतेपदाची आस आहे. अजूनही दिल्लीची जेतेपदाची झोळी रिती आहे. सध्या पर्समध्ये 21.8 कोटी शिल्लक असून 8 स्लॉट शिल्लक आहेत. यात 5 विदेशी खेळाडूंना संधी मिळणार आहे. दिल्लीने फाफ डुप्लेसिस, जॅक फ्रेझर मॅकगर्क यासारख्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे विदेशी स्लॉट भरण्याचं मोठं आव्हान असणार आहे. खासकरून टॉप ऑर्डर फलंदाजांची उणीव भरून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे लिलावात दिल्ली कॅपिटल्सची नजर ही वेंकटेश अय्यर आणि जोश इंग्लिस असेल.
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, करुण नायर, समीर रिजवी, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, अजय मंडल, मुकेश कुमार, मिचेल स्टार्क, टी नटराजन, दुष्मंता चमीरा (नीतीश राणा (ट्रेड))
गुजरात टायटन्स : शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात संघात सध्या 19 खेळाडू आहेत. तर मिनी लिलावात खर्च करण्यासाठी 12.9 कोटी आहेत. एकूण 5 स्लॉट शिल्लक आहेत. त्यात 4 विदेशी खेळाडूंसाठी आहेत. गुजरातला एका चांगल्या फिनिशरची गरज आहे. शेरफेन रूदरफोर्डला ट्रेडच्या माध्यमातून मुंबईला दिलं. त्यामुळे संघाला एका अष्टपैलूची गरज आहे. डेथ ओव्हरमध्ये सामना खेचण्याची आणि मॅच फिनिशरची भूमिका बजावणारा खेळाडू हवा आहे. यासाठी त्यांची नजर आंद्रे रसेल, लिविंगस्टोन, विजय शंकर, महिपाल लोमरोर, डेविड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर असेल.
गुजरात टायटन्सने रिटेने केलेले खेळाडू : शुबमन गिल, साई सुदर्शन, राशिद खान, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जॉस बटलर, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बराड़, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव
लखनौ सुपर जायंट्स : या फ्रेंचायझीकडे 22.95 कोटी शिल्लक आहेत. मिनि लिलावात 6 खेळाडूंवर बोली लावू शकतात. यापैकी 4 खेळाडू हे विदेशी असतील. लखनौने डेविड मिलर आणि रवि बिश्नोई यांनी रिलीज केलं आहे. त्यामुळे मॅच फिनिशरची गरज आहे. तसेच मधल्या फळीत चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन षटकं काढेल असा गोलंदाज हवा आहे. त्यामुळे बोली लावताना लखनौ काळजीपूर्वक निर्णय घेईल यात काही शंका नाही. त्यांची नजर रमणदीप सिंग, क्विंटन डिकॉक, आंद्रे रसेल, रचिन रवींद्र, एडम झाम्पा, हसरंग आणि महीश तीक्षणावर असेल.
लखनौ सुपर जायंट्सने रिटेन केलेले खेळाडू: ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्जकी, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, (मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर (ट्रेड))
मुंबई इंडियन्स : पाचवेळा जेतेपदावर नाव कोरल्यानंतर सहाव्यांदा जेतेपदाची आस घेऊन मुंबई इंडियन्स रणनिती आखत आहे. खरं तर या संघात सर्वात दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे रिलीज करताना मुंबईने हात आखडता घेतला. सध्या मुंबईकडे 20 खेळाडू असून 5 स्लॉट रिकामी आहेत. त्यातही एकच स्लॉट हा विदेश खेळाडूसाठी आहे. पण फ्रेंचायझीकडे फक्त 2.75 कोटी रुपये आहेत. त्यामुळे बोली लावताना स्वस्तात मस्त खेळाडू घ्यावा लागेल. त्यामुळे लो प्रोफाईल देशांतर्गत खेळाडूंवर नजर असेल.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिन्ज, मिचेल सैंटनर, नमन धीर, विल जैक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर. (शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे (ट्रेड))
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचं जेतेपद थोडक्यासाठी हुकलं. अंतिम सामन्यात आरसीबीकडून पराभवाची चव चाखावी लागली. मात्र पुन्हा एकदा पंजाब किंग्स नव्याने सज्ज झाली. 21 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर पाच खेळाडूंना रिलीज केलं आहे. आता 11.5 कोटी शिल्लक असून त्यामुळे पंजाब किंग्स काही जास्त बोली लावताना दिसणार नाही. स्टोयनिसची जागा भरून काढण्यासाठी फार तर कसरत करेल. डेविड मिलर, रचिन रवींद्र आणि कॉनवेपैकी एकासाठी प्रयत्न करतील.
पंजाब किंग्सने रिटेने केलेले खेळाडू: श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, नेहाल वढेरा, मुशीर खान, हरनूर सिंह, विष्णु विनोद, शशांक सिंह, पायला अविनाश, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसन, अझतुल्लाह ओमरजाई, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, झेव्हियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल आणि हरप्रीत बराड.
राजस्थान रॉयल्सने : राजस्थानने संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करनला संघात घेतलं आहे. सध्या पर्समध्ये 16.05 कोटी शिल्लक आहेत. 9 स्लॉट असून एक विदेशी खेळाडू घेता येईल. जयपूरची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाला साथ देणारा फिरकी गोलंदाज हवा. राजस्थानचं लक्ष हे अनुभवी फिरकीपटूकडे असणार आहे. लेग स्पिनर कर्ण शर्मा, रवि बिश्नोईसाठी फिल्डिंग लावतील. ग्लेन मॅक्सवेलही ही जाग भरू शकतो.
राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेले खेळाडू: यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, वैभव सूर्यवंशी, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, युद्धवीर सिंह चरक, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुहान ड्रिप्रिटोरियस. (डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा आणि सॅम करन (ट्रेड))
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : गतविजेत्या आरसीबी संघात 17 खेळाडू आहेत. तर आठ खेळाडूंना रिलीज केलं असून 16.4 कोटी हातात आहेत. आरसीबीला एक विदेशी वेगवान गोलंदाज हवा आहे. हेझलवूडच्या गैरहजेरीत भूमिका बजावू शकेल. लुंगी एनगिडीला रिलीज केल्याने ही गरज आहेच. त्यामुळे वेगवान गोलंदाजावर नजर असणार आहे. डेथ ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला साथ देईल असा गोलंदाज निवडण्यावर भर असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुने रिटेन केलेले खेळाडू: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेझलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जैकब बॅथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा आणि अभिनंदन सिंह.
सनरायझर्स हैदराबाद : या संघात सर्वोत्तम स्टारकास्ट आहे म्हंटलं वावगं ठरणार नाही. कारण फलंदाजीची बाजू एकदम भक्कम आहे. त्यांना पाहूनच गोलंदाजांना घाम फुटतो. हैदराबादने 10 खेळाडू रिलीज केले आहेत. त्यात दोन जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. पर्समध्ये 25.5 कोटी शिल्लक आहे. हैदराबादचा संघ झाम्पा आणि चाहरला रिलीज केल्यानंतर अनुभवी फिरकीच्या शोधात असतील हे नक्की. त्यांची नजर रवि बिश्नोईवर असेल. हसरंगा किंवा तीक्षणावर नजर असेल. मोहम्मद शमीला ट्रेड केल्याने गोलंदाजीची बाजू भक्कम करावी लागेल. टीम आकाश मढवा, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, आकाश दीप आणि राजवर्धन हंगरगेकरवर असले. पथिराना आणि नॉर्त्जेवही नजर असेल.
सनराइजर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू : पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिख क्लासन, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, रविचंद्रन स्मरण, कामिंडु मेंडिस, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स, ईशान मलिंगा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झिशान अंसारी आणि अनिकेत वर्मा
