मतमोजणीला सुरुवात, काही क्षणात हाती कल येणार

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६ साठी मतमोजणी सुरू झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे. सकाळी ९:५५ वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली, त्यानंतर बरोबर १० वाजता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू करण्यात आली.

मुंबईतील वॉर्ड १८२ आणि १८३ मध्ये मतमोजणी सुरू झाली आहे, तर चेंबूरमधील कलेक्टर ऑफिस आणि मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड येथेही मतमोजणी केंद्रांवर लगबग दिसून येत आहे. उमेदवार, त्यांचे समर्थक आणि प्रमुख राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. एक्झिट पोलचे आकडे तसेच राहणार की काही वेगळा निकाल लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही क्षणातच पहिले कल हाती येण्यास सुरुवात होईल आणि राज्याचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.