शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज निकाल येणार आहे. या आधी शिंदे गटाच्या नेत्याने सर्वात मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अपात्रतेच्या निकालाबाबत दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी जाहीर केलं आहे की, आज संध्याकाळी 5 साडे पाच वाजेपर्यंत निकाल येईल, असं शिरसाट म्हणाले आहेत.
आमचाच विजय असेल, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.16 आमदार पात्र की आपत्र हा विषय सुप्रीम कोर्टात गेलेला होता. त्यांनी अध्यक्षांकडे दिलेला होता. एकनाथ शिंदे आणि आम्ही केलेल्या उठाव केला. त्याला यांनी चॅलेंज दिलं आहे. याबाबत कायदेशीर बाबी आम्ही विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या. त्यांना कायदेशीर बाजू मांडता आली नाही. हा निकाल महाराष्ट्रत नाही तर देशभरात अशी घटना घडली तरी हा मार्गदर्शक ठरेल, असं शिरसाट म्हणालेत.