29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत, पहिली सोडत STप्रवर्गासाठी

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईसह २९ महापालिकांचा महापौर पद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. SC साठी 3, ST साठी 1, तर OBC साठी 8 आणि ओपनसाठी `17 जागा आहेत. थेट मंत्रालयातून या आरक्षणाची सोडत होत आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदासाठीच्या आरक्षणसाठी सोडतं निघाली आहे.