शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा आवाज?

दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने चांगलीच तयारी केली होती. काही महिने आधीच ठाकरे गटाने मैदानाची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले होते. मात्र, महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता. मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला स्मरण पत्र पाठवले होते. अखेर ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबई महानगर पालिकेने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.