16 जानेवारीला शरद पवार जिल्हा दौऱ्यावर….

मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासह अनेक कार्यक्रम होणार आहेत.

सांगली येथे स्टेशन चौकात महापालिकेतर्फे राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे आणि या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ते सांगलीत येणार आहेत.

पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर ते एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी जाणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.