उद्धव ठाकरे यांनीचं सर्व..युतीमध्ये असताना मनसेकडून पहिल्यांदाच थेट खळबळजनक आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी आज सकाळी मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. सकाळी साडेदहा वाजता बोलावण्यात आलेल्या या बैठकीला मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे तसेच मुंबईतील विविध विभागाध्यक्ष उपस्थित होते. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, यावर्षी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. शिवतीर्थावर प्रमुख कार्यक्रम होणार असून त्यासाठी विस्तृत नियोजन सुरू आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार (Raj Thackeray) टीका केली. “सुपर प्रवक्त्यांना आता सुपर उद्धव ठाकरे यांची भीती वाटते का?” असा सवाल करत त्यांनी चंद्रपूरमधील घडामोडींवरून टीका केली. त्यांच्या मते, चंद्रपूरमध्ये जे काही राजकीय घडले त्याची कल्पना संबंधितांना आधीपासून होती आणि आता वक्तव्ये उलट ठरत असल्याने बचावात्मक भूमिका घेतली जात आहे.
चंद्रपूरमधील राजकीय व्यवहारांबाबत आधीच माहिती असूनही सार्वजनिकरित्या वेगळी भूमिका घेतली गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. “मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला लगावत मनसेने शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मराठी भाषा दिनाच्या तयारीसोबतच राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे ही बैठक चर्चेत आली आहे.