छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीा आले आहे. यंदाच्या सिझनमधील घरातील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके (जो ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखला जातो) सतत चर्चेत आहे. त्याच्या तीक्ष्ण निरीक्षणशक्तीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरातील सगळ्यात छोटा सदस्य असला तरी त्याची नजर मात्र घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते.
बिग बॉस मराठीच्या आगामी एपिसोडमध्ये प्रभू शेळके घरातील एका महिला सदस्याचं गुपित उघड करताना दिसतोय. प्रभूने तन्वी कोलतेसोबत गप्पा मारताना हे रहस्य शेअर केलं आहे.प्रभू म्हणतो, “मी अशा खुर्चीवर बसलो होतो जिथून मी दिसत नव्हतो. तिने इकडे-तिकडे बघितलं, मग माइक काढून घेतला आणि मेकअपच्या पिशवीत ठेवला. आतमध्ये एवढी छोटी पिशवी… रात्री ती काहीतरी करणार आहे!”
पुढे प्रभू म्हणतो, “एकदा कॅप्टन झाली. परत आली. माझं डोकं फिरलंय, बेकार!” सध्या घरात तन्वी कोलते कॅप्टन आहे आणि प्रभू हे सगळं तिच्यासोबतच बोलत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की, हे रहस्य नेमकं कुणाबद्दल आहे?प्रभू नेमकं काय पाहिलंय आणि ती महिला सदस्य रात्री काय करणार आहे? हे स्पष्ट होण्यासाठी प्रेक्षकांना आगामी एपिसोडची वाट पाहावी लागणार आहे. या घटनेने घरातील ड्रामा आणखी वाढला असून, प्रभूच्या ‘छोटा डॉन’ या भूमिकेला आणखी एक नवीन आयाम मिळाला आहे. पाहूया, पुढे काय घडतं!
