राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे प्रकृतीच्या कारणास्तव त्रस्त होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना आज सकाळी अचानक अस्वस्थता आणि थकवा जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांना सलाईन लावण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे.
Related Posts
विट्याच्या जडणघडणीत योगदान असणाऱ्यांचे स्मरण करणे कर्तव्य ; आ. बाबर
विट्याच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे आपले परमकर्तव्य आहे; मात्र असे कार्यक्रम एखाद्या खोलीत घेण्यापेक्षा जाहीरपणे घेऊ,अशी…
पुन्हा अवकाळीचा धोका……
देशासह राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा अवकाळीचा धोका (Unseasonal Rain) असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये…
विटा नगरपरिषदेचा १४० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
विटा नगरपरिषदेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा तब्बल १४० कोटी ३ लाख ४७ हजार ५६५ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक डॉ.…
