सोलापूर 14 जानेवारी ( हिं.स) कोल्हापूर व पुणे विभागातील गाळपाचा वेग दररोज वाढत असला तरी आज सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. माञ काही दिवसात कोल्हापूर व पुणे विभागातील साखर कारखाने ऊस गाळपात पुढे जाण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळपाचा पाच लाखाचा टप्पा पार केला आहे.
सोलापूर विभागाचे गाळप ११३ लाख तर कोल्हापूर व पुणे विभागाचे गाळप १११ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्हाचे गाळप ९० लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता वेग घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला ऊस तोडणी मजुरांमुळे गाळपाला व्यत्यय आला होता माञ नंतर काही साखर कारखाने वगळता पुरेशा तोडणी यंञनेवर साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू आहेत. यंञनेअभावी काही साखर कारखान्याचे गाळप अतिशय मंद गतीने सुरू आहे.