शहाजीबापूंंनी ललकारले गणपतआबांच्या नातवाला….

आपल्या सर्वांना माहीतच आहे की सांगोला हा तालुका दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. पान्या अभावी येथील शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे खूपच हाल होत राहतात.

तशातच येथील नेते मंडळींची पाणी तालुक्यात कसे येईल याकडे पुरेपूर लक्ष देखील असल्याचे चित्र पाहायला मिळते. टेंभूचे पाणी सांगोला तालुक्यातील माण नदीत आल्यामुळे माझे स्वप्न साकार झाले आहे. टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिवस उगवला आहे.

पण, आमचे विरोधक आजही गणितं मांडत आहेत. गणित समजून घ्यायचे असेल तर माझ्याकडे या. तुमच्या आजोबाला जे जमलं नाही, ते तुम्हाला कुठं जमायचं. नादाला लागू नका, आमचं आम्ही गणित करतो, अशा शब्दांत आमदार शहाजी पाटील यांनी माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापला आव्हान दिले आहे.

सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना १ टीएमसी आणि माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून तीन वेळा भरण्यासाठी ०.६०० एमसीएफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या समारंभात बोलताना शहाजीबापूंनी शेकापला आव्हान दिलं.