आज सांगोला येथे शिवतीर्थाचे होणार लोकार्पण…..

आज सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांगोला येथे शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. गेले अनेक वर्षापासून शिवप्रेमींचे असणारे स्वप्न साकारत असताना शिवप्रेमी मंडळाला अतिशय आनंद होत आहे. 27 सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाचे सांगोला शहरांमध्ये आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जल्लोषात स्वागत सर्व जातीधर्मातील बांधवांनी फटाके, पेढे, गुलाल, फुलांची उधळण करून भव्यदिव्य असे स्वागत केलेले होते.

शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर आज सोमवारी 7 ऑक्टोबरला शिवतीर्थाचे लोकार्पण होणार आहे. या शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याला सर्व शिवप्रेमींनी सहकुटुंब पारंपारिक वेशभूषामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.