सोलापूरात लोकांची पाण्यासाठी वणवण……


आपल्या सगळ्या जणांना माहितच आहे कि सोलापूर जिल्हा हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. पिण्याचे पाण्यासाठी देखील खूपच वणवण करावी लागते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून पेयजल टंचाई निवारण आराखड्यातून तीन तालुक्यांतील चार गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

टेंडरची मुदत संपल्याने टँकर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चार गावांतील सुमारे दहा हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणी टँकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, नातेपुते, माढा तालुक्यातील मोडनिंब, करमाळा तालुक्यातील घोटी या गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मात्र डिसेंबर २०२३ अखेर टँकरच्या ठेक्याची मुदत संपली आहे. या चार गावांत टँकरने होत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे गावातील नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू
करण्यात आला आहे, परंतु टेंडरची मुदत संपल्यामुळे पाणीपुरवठा अचानक बंद केल्याने नागरिक, जनावरे यांची तारांबळ होत असून लवकरात लवकर टँकर सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.