लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोर्चे बांधणी करीत आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लवकरच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा आपापल्या कामांमध्ये लागलेला आहे.
इस्लामपूर शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि शिवसेनेचे आनंदराव पवार हे आपापले गट मजबूत करण्यासाठी व्यस्त आहेत.
या उलट इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीच्या गटाला धक्का बसू नये किंवा ताकद कमी होऊ नये यासाठी आमदार जयंत पाटील यांनी कासेगाव येथे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.