राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसाचा फटका बर्याच शेतकर्यांना झालेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे. यामुळे फळबागा, आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.अशातच पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसेच नगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.आज, सोमवारी मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे.