विट्यात मगदूम हॉस्पिटल समोर आढळला मृतदेह…

विट्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. विट्यात मगदूम हॉस्पिटल समोर एक बेवारस मृतदेह आढळला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार व्यक्तीचा हा मृतदेह असल्याची माहिती मिळत आहे.

हा बेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांकडून या मृतदेहाचा पंचनामा करून नातेवाईकांचा शोध सुरू झालेला आहे. विट्यामध्ये असे अनेक निराधार व्यक्ती भटकंती करून आपले जीवन जगत आहेत. काही लोक तर जागा दिसेल तिथे आपली रात्र काढीत असतात. विटा येथील मगदूम हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या ओम मेडिकल समोर झोपलेला वृद्ध मृत अवस्थेत आढळून आलेला आहे.

सकाळी या वृद्धाची हालचाल सुरू होती यानंतर मात्र या व्यक्तीची हालचाल बंद झाली. या प्रकाराची माहिती आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केलेला आहे.