भगव्या झेंड्यासाठी इचलकरंजीला पसंती!

आपण सर्वजणच 22 जानेवारी ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे गावोगावी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केलेले आहे. तर इचलकरंजीत भगवे झेंडे, टी-शर्ट, कुर्ता आधी उत्पादनाला खूपच गती मिळालेली आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगात एक प्रकारची दिवाळीच साजरी होत आहे.

दिवाळीनंतर पुन्हा एकदा एक आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. ते फक्त आणि फक्त आयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेमुळे. 22 जानेवारीला अयोध्येला हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

त्यामुळे प्रत्येक गावातील लोक हे 22 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच भगवे झेंडे, भगवे टी-शर्ट तसेच भगवा कुर्ता यांना देखील खूपच मागणी वाढलेली आहे. श्रीरामांचे जय श्रीराम लिहिलेले टी-शर्ट ही एक नवीन क्रेझ दिसून येत आहे आणि या सर्वांनाच मागणी वाढल्यामुळे इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला चालना मिळालेली आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगात उलाढाल खूपच वाढणार देखील आहे.