मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. लाखो मराठ्यांच्या साथीने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. तर आज अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह हे मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. 20 जानेवारीपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. मात्र सरकारने ही मागणी पूर्ण केली नसल्याने मनोज जरांगे मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. आज सकाळीच जरांगे पाटील जालन्यातील अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले. तर मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगे भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
Related Posts
जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा!
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच…
इचलकरंजीत श्री दत्त जयंतीनिमित्त १९ पासून सुरु होणार अखंड नाम जप यज्ञयाग, गुरुचरित्र पारायण सोहळा!
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी…
खासदार सुप्रिया सुळेंची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया !
लोकसभेतल्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन खासदारांनी चर्चेची मागणी केली. त्यानंतर काल लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यापाठोपाठ आजही निलंबन करण्यात…