सोलापुरात मोदींना पवारांचा चिमटा….

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच त्यांच्या हस्ते ९० हजार घराचे लोकार्पण देखील करण्यात आलं, यावेळी पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान आज सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. मोदींनी सोलापुरात मूळ प्रश्नाकडून दूर नेण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली आहे.पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोलापूर येथे लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम हे देखील उपस्थित होते.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र त्यांनी नरसय्या आडाम यांची योग्य ती दखल घेतली नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं हे पाहूण या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अश्रू अनावर झाले, यावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं.राजकारणात पक्ष आणि विचारधारा वेगळी असते. पण हे विधायक काम वेगळी असतात.

हे विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी चार शब्द चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून दिसलं असतं. डावे-उजवे हे नेहमी मनात ठेवलं तर मग विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका हवीय ती बघायला मिळत नाही. ही काही गोष्ट चांगली झाली नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.