नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या रविवारी पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे.दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होईल, अशी माहिती मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहे. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण पूर्ण झाली आहे. विमानतळाच्या इमारतीचे कामं देखील अंतिम टप्प्यात पोहचले आहे. इतर कामेही वेगात सुरू आहेत.
31 मार्च 2025 ची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी पहिले व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.रविवारी दुपारी ठीक 12 वाजता इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे वर लँडिंग करणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.
त्यानुसार महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात येणार असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.