मराठा आरक्षण हा मुद्दा खूपच गाजावाजा करत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी मुंबईकडे आगेकूच केलेली आहे. तरी यासाठी प्रत्येक गावातून त्यांना पाठिंबा देखील मिळत आहे. हजारो मराठा बांधव हे त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत.
तर विटा शहरात आज बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला मराठा बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी विटा शहर हादरवून सोडले आहे. सुहास भैया बाबर आणि वैभव दादा पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी विट्यामध्ये यलगार दिला आहे.
24 जानेवारी रोजी मुंबईला धडक देण्याच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी विटा तालुक्यातील वातावरण टाइट केले आहे. हजारो मराठा बांधवांनी बाईक रॅली काढून विटा शहर हे आज भगवामय केले आहे. या बाईक रॅली नंतर शंकर नाना मोहिते यांनी मुंबई जाण्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना देखील मराठा बांधवांना केलेल्या आहेत.