आज-काल आपणाला चोरीच्या अनेक घटना ऐकायला मिळतातच. चोर हे कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपले हात लांबवून खिसा रिकामा करतातच. अलीकडच्या काळामध्ये सांगोला शहरांमध्ये चोरीच्या प्रमाणात भरपूर वाढ होतानाचे चित्र आहे.
सांगोला शहरातील किराणा बाजार, कापड बाजार, सराफ बाजार हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या ठिकाणाहून अनेकदा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यरत करण्याची गरज आहे.
कारण सांगोला शहरातील रविवारी होणाऱ्या आठवडा बाजारांमध्ये चोरीच्या घटना या रोजच्या झालेल्या आहेत. चोरी तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जातात परंतु चोरीच्या घटना देखील वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा शहरातील मुख्य चौकामध्ये कार्यरत करावी अशा प्रकारची मागणी सांगोला शहरवासीयातून केली जात आहे.