मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरासह जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव उपोषणासाठी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी सोबत कार, जीप, टॅम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनांचा सोबत होता. मराठा बांधवांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने आगेकूच केली. शहरातून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून बाळे, केगाव, पाकणी मार्गान मुंबईकडे रवाना झाले. या मार्गात ठिकठिकाणाहून हजारो मराठा बांधव सामील होणार आहेत. रविवारी (दि. २१) भिगवण, दि. २३ रोजी पुणे, दि. २४ लोणावळा, दि. पनवेल, दि. २६ रोजी चेंबुर येथे मुक्काम करणार आहेत.