टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडचं नेतृत्व आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. पहिला सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचा अनुभवी आणि माजी कर्णधार असलेला फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. विराटने अचानक अशी माघार घेतल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.