गोकुळ’ने केली खर्च अनुदानात वाढ..

म्हैस दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ’ दूध संघाने प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ केली आहे. ही वाढ केवळ म्हैस दुधालाच व ज्यांचे १०० लिटरपेक्षा अधिक म्हैस दूध संकलन आहे, अशा संस्थांना प्रतिलिटर १० ते २५ पैशांपर्यंत ही वाढ मिळणार आहे.

गोकुळ’च्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण, मागणी आणि उत्पादन यात तफावत असल्याने म्हैस दूध वाढीसाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत. संघाने १७ लाख ५० हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला. यामध्ये जवळपास ९ लाख २५ हजार लिटर म्हशीचे दूध आहे. आगामी वर्षभरात प्रतिदिनी २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करायचा आहे, त्यादृष्टीने संचालक मंडळाने कंबर कसली आहे.म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दराबरोबरच परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ केली. उत्पादकांबरोबरच आता, दूध संस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी व्यवस्थापन खर्चात वाढ केली आहे

वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ४ व गायीच्या दुधाला २ रुपये दिले जात होते. पण, यामुळे संस्था अडचणीत येतात. यासाठी त्यामध्ये वाढ करून अनुक्रमे ६ व ४ रुपये देण्यात येणार आहेत.