Rain Alert महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस….

एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढलेल्या असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

सध्या डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हवेत मोठा गारवा निर्माण जाला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे.

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, एकीकडे नागरिकांना हुडहुडी जाणवत असताना दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.