सांगोला तालुक्यातील वाळू उत्खनन बंद न झाल्यास रस्त्यावर उतरणार….

कमलापूर गावातील सर्व गावकऱ्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनामध्ये कमलापूर गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला आहे.गेल्या काही वर्षामध्ये मान नदीतून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे पर्यावरण तसेच भूजल पातळीची खूपच मोठी हानी होत आहे. यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे.

याच संदर्भात कमलापूर गावातील युवक एकनाथ शेंबडे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. वाळूचे उत्खनन झाल्यामुळे पाण्याची पातळी देखील खालावली आहे. यामुळे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, युवानेते अनिकेत देशमुख यांनी भेट घेतली.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तहसीलदारांना जाब विचारला आणि वाळू उत्खनन बंद करण्यासाठी वेळ देण्याचे निश्चित झाले. वाळू उत्खनन तीन आठवड्यात बंद करण्याचा शब्द तहसीलदारांनी दिलेला आहे.